काय झालं सांगना रे देवा

        काय झालं काहीच समजत नाही मला, कोनत्या जन्माची सजा मिळत आहे काहीच कळत नाहीये मला.

      हे ईश्वरा काय चुकलं माझं सांगणा मला, का एवढी मोठी सजा दिलास तू माझ्या परिवाराला.

    तुझ्या नावाचा याड लागलंय मला, तुझ्या भक्तीची ओड लागलीय मला.... तूझ्या नावात रमून गेलोय मी,  देवा तुझ्या भक्तित मग्न झालोय मी,  तुझी सेवा केलोय मी..... तरीही माझी प्रार्थना नाही एकलास तू.....‌‌

       तूला मंदिरातील मंजिरि,घंट्याचा आवाज ऐकू येतो.                    तुला तूझ्या चरनातील फूलाचा सूगंध येतो,.                       तूला तूझ्या आरतीतील टाळ्यांच्या आवाज येतो,.                      तूला तूझ्या प्रसादाची गोडी असते, पण तूला माझ्या भक्तीची कदर का नाही रे देवा‌‌..........

         किती होता देवा माझा विश्वास, का केला रे तू घात,.   मला नको धन दौलत, मला हवा होता तुझा आशिर्वाद‌....... संकटाच्या वेळी येतो तू धावुनी ,असं म्हणतात लोक.......       सांगना रे देवा काय केलेस मी पाप,.कसा बसलाय डोळे मिटून..

 मला काहिही नको आहे देवा , फक्त तूझी साथ हवी आहे,,,.             संकटाला तुझ्या आशिर्वाद चा हात हवा आहे,,,,,,,,,,.          तुझे नाव घेता घेता नाही थकलो मी कधी,ह्रदया पासुनी केली तूझी भक्ती, तरीही मला देतो सजा कोनत्या जन्माची.....‌‌. 

तूझ्या चरनी केली मी प्रार्थना, किती मारल्यास तूला हाका, येशील धावुनी संकटाला, तुला नाही कळल्या माझ्या भावना... किती घेतो माझी परिक्षा, कधी करणार पूर्ण माझी इच्छा..... 

तुझ्या नावात जरी असेल शक्ती, साथ देणारणा तू माझी, संकटास येना देवा धावूनी,काळ कंठ दुर कर रे ईश्वरा 

   तूला केली प्रार्थना, केली विनवनी,  काय झालं का बसलाय डोळे मिटूनि , तूझ्या चरनी मांगतो भिक, माझ्या परिवाराला देना सुख, 

कसं समजू तू आहेस रे देवा, कसं समजू तुझ्या नावात आहे शक्ती, माझी नाही केलीस कदर, कसा आनाला रे काळ,,,,,,  कधी देणार तुझी साथ कधी देणार आशिर्वाद, तू नाही आहेस रे देवा,, तू नाही फक्त तूझ नाव आहे,,,,...

   माझे आई-वडील माझे देव,क्षनोक्षनी तेच साथ देणार, आपल्या चिलापिल्याना सुखी ठेवानार, त्यांच्या आशीर्वादाने सर्व ईच्छा पुर्ण होनार, सारं दूख दूर होनार, माझ्या आई वडील च्या चरनात मला देव मिळणार,......... 

मि आता फक्त माझ्या आई वडिलांचीच सेवा करनार, त्यांचिच भक्ती करनार, कारनं तेच खरे देव जे आपल्या बाळांना काही च होऊ देणार नाही, त्यांच्या दुःखात साथ देणारे सर्व संकटे आपल्या वर घेणारे माझ्या बाळाला सुखी ठेव म्हणून नेहमी प्रार्थना करणारे , नेहमी आपल्या चिलापालांसाठी जगणारे....‌‌खरे देव म्हणजे आई-वडीलचं त्याचाच आशिर्वाद घ्यावा 

                                             कु आरती जगदिश चव्हाण


       

 




 


          

 

Comments

Popular posts from this blog

आयुष्य.......‌‌‌

नाईक साहेबेर कहाणी..‌‌‌‌‌...