आयुष्य.......
आयुष्य म्हणजे जगात येताना आपल्या कडे देह असतं, पण नाव नाही. जग सोडताना मात्र आपल्या कडे नाव असतं पण देह नाही.मिळालेल्या देहाचे रूपांतर नावात करन्याचा हा प्रवास म्हणजे आयुष्य........
आयुष्य म्हणजे ऊन पावसाचा लपंडाव, क्षनात ऊन तर क्षनात पावसाच्या सरी येण्याची शक्यता.....
आयुष्य म्हणजे अंधार प्रकाशाचा खेळ, तरीही अंधारात नंतर लख्ख प्रकाशाची आस महत्त्वाची......
आयुष्य म्हणजे जय पराजय, तरीही धगधगती जिद्द हल्ल्यानंतरही वार करन्याची ......
आयुष्य म्हणजे आशा-निराशा तरीही ओढ,,,, निराशेवर मात करून आशेच्या दिशेने पूढे जाण्याची.......
आयुष्य म्हणजे निर्मिती,. आयुष्य म्हणजे स्वप्न पूर्ण करण्याची पूर्ती,. आयुष्य म्हणजे भावभावनांची व्युत्पत्ती, मनची सदाबहार भ्रमंती.... आयुष्य म्हणजे सर्व काही टवटवित-रसरसीत आणि सूगंधित जगायला प्रोत्साहित करनार ,,,,,, जगायला बळ देनार.......
आयुष्य असच जगायच असत..
जे घडले ते सहन करायचं असतं, बदलत्या जगाबरोबर बदलायच असतं .....,..
कुठुन सुरु झालं माहिती नसल तरी, कूट तरी थांबायच असतं........
कूनासाठी काहितरी निःस्वार्थ पने करायचं असतं,. स्वतः घ्या सुखापेक्षा दूसर्याना आनंद द्यायचं असतं.......
दुःख आणि अश्रूंना मनात कोंडुन ठेवायचं असतं, हसता आलं नाही तरी हसवायच असतं........
पंखामधे बळ आलं तर घरटं सोडायचं असतं,,, आभाळात झोपावुनही धरतीला विसरायचं नसतं......
मरनान समोर येऊन जिव जरी मांगीतलान तरी मांगून मांडून काय मांगीतलसं असं मनायच असतं.......
इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायच असतं .... पण जग सोडताना मात्र समाधानाने जायचं असतं....,.
आयुष्य थोडचं पण हसत खेळत मजेत जगायच असत...
कु आरती जगदिश चव्हाण
अप्रतिम सखे.....!!
ReplyDeleteआयुष्याची व्याख्या अतिशय सुंदर अन् सोप्प्या पद्धतीने मांडलीय तु अगदी...!!
आणि जीवन हसतखेळत यशापयशाचा स्विकार करत जगायचं हे ही सांगून गेलीय तुझी कविता अन् लेख देखील.
Keep it up dear.......!!✨👍🏻👍🏻
Thanks 😊😊 dear
Delete